10 वी व 12 वी नंतर मुंबईमध्ये ऑटोमोबाइल अभ्यासक्रम - नोकरीची पूर्ण हमी
ऑटोमोबाइल तंत्रज्ञ

10 वी व 12 वी नंतर मुंबईमध्ये ऑटोमोबाइल अभ्यासक्रम - नोकरीची पूर्ण हमी

Home » Courses » ऑटोमोबाइल तंत्रज्ञ

10 वी नंतर व 12 वी नंतर सध्या किती तरी करीअरसाठी संधि उपलब्ध आहेत. जर तुम्हाला गाडयांची विशेष आवड असेल तर मग हे ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगचे क्षेत्र खास तुमच्याचसाठी आहे असे समजा. मुंबईची सी इ डी पी कौशल्यवर्धन संस्था तुमच्यासाठी ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगचा विशेष अभ्यासक्रम देवून असे प्रशिक्षण देईल की तुम्हाला आवडीची नोकरी तर मिळेलच पण करिअरमध्ये अधिकाधिक संधि उपलब्ध होतील. तुम्हाला हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर उत्तमोत्तम नोकऱ्या चालून येतील. सध्या गाडयांचे विष्व आजवर नाही इतके मोठे होत आहे. ऑटोमोबाइल जगतातील  अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या कंपनींचा डोळाही हल्ली भारताच्या बाजारावर आहे. गाडयांचा वापर वाढल्याने त्यांची देखभाल करणाऱ्या व त्या दुरुस्त करणाऱ्या ऑटोमोबाइल इंजिनिअरची गरजही आभाळाला जावून भिडली आहे. सी इ डी पी संस्थेने ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगचा शास्त्र व प्रात्यक्षिकाचे तौलनिक उत्तम ज्ञान देणाऱ्या अभ्यासक्रमाची आखणी केली आहे.

सरकारची मान्यता!

मुंबईची सी इ डी पी संस्था ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांतर्गत पुढील विषयांचे प्रशिक्षण देतेः

गाडयांची यांत्रिकी रचना व त्यांचे तंत्र याविषयीचे सर्वतोपरी ज्ञान ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी अभ्यासक्रमात मिळते. गाडयांची मूलभूत माहिती, त्यांच्यातील बिघाड व ते घडण्याची कारणे, त्यांची दुरुस्ती, देखभाल व त्यांच्या यांत्रिकी रचनेचे विविध भाग

ऑटोमोबाइल क्षेत्रातील मूलतत्वे – ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी म्हणून तुम्ही गाडयांची सर्व मूलभूत तत्वे व त्यांच्या यांत्रिकी चलनाची सर्व माहिती करून घेता. चारचाकी गाडीचेही तुम्हाला प्रशिक्षण मिळते व त्या गाडीचे विविध भाग व त्यांचा उपयोग यांचेही ज्ञान मिळते

समस्यांचे निराकरण – मोठे ट्रक्स किंवा सेदानअशा गाडयांना अनेक प्रकारच्या समस्या उदभवतात. मग कारण काही असो; गाडयांचे भाग गंजल्यामुळे असो वा त्या भागांचे काम नीट न झाल्याने असो वा रोजच्या वापराचा परिणाम असो! ऑटोमोबाइल इंजिनिअर वा मेकॅनिक गाडीतील बिघाड बरोबर शोधून काढतो व दुरुस्त करतो. ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगच्या पदविकेचे प्रशिक्षण घेतले की तुम्ही गाडयांच्या सर्व समस्या दूर करू शकता

इंजिनची मूलतत्वे – दिवसेंदिवस गाडयांचे तंत्रज्ञान प्रगत होत चालले आहे. पेट घेणाऱ्या पदार्थाचे ज्वलन करण्याचा इंजिन चालविण्यासाठी साधारण उपयोग केला जातो. आजही रस्त्यावरील बहुतेक गाडयाअशाच चालतात. दोन दोन वेगळया पद्धतीने चालू शकणाऱ्या गाडयाही आता उपलब्ध आहेत व विजेवर चालणाऱ्या गाडयाही बनविल्या गेल्या आहेत. या नवीन तंत्रज्ञानाचेही प्रशिक्षण उत्तम आखलेल्या अभ्यासक्रमामध्ये करणे गरजेचे असते.

वाहनाच्या सुविधा – बऱ्याच जणांना केवळ येथून तेथे नेण्यापुरता गाडीचा उपयोग करावयाचा नसतो. तर त्यांना वाय फाय, जी पी एस, साउंड सिस्टम, प्रकाशयोजना, एअर कंडिशनिंग इत्यादि अधुनिक सुविधा गाडीत पाहिजे असतात. या सुविधांची देखिल काळजी घेणे एका ऑटोमोबाइल इंजिनिअरला गरजेचे असते

100 टक्के नोकरीची हमी!

ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगला ला प्रवेश पाहिजे असेल तर ताबडतोब फोन करा 1-800-123-5226 अथवा वेळ न घालविता व्हॅाटस अॅप करा 8879787553 या नंबरवरती!

कालावधिः एकूण 12 महिने. 4 महिने शास्त्राचा अभ्यास, सिद्धान्त व्यक्त करणारा सहभाग घ्यायला लावणारी प्रात्यक्षिके शैक्षणिक सहल औद्योगिक तज्ञांची व्याख्याने व विविध वास्तूंची भेट

संपूर्ण 8 महिन्यांच्या दीर्घ कालावधीत प्रत्यक्ष अनुभव देणारे अग्रगण्य ऑटोमोबाइल कंपनीत प्रशिक्षण

 

6 जलद अभ्यासक्रम तथ्ये

सहज मिळणारी नोकरी

आता ऑटोमोबाइल औद्योगिक क्षेत्र इतके प्रगत झाले आहे की भारताच्या कोणत्याही कोन्याकोपऱ्यात नोकरी सहज मिळण्यासारखी आहे. कारण मेकॅनिकची गरज व गाडयांचा वापर दोन्ही गोश्टी भरपूर प्रमाणात वाढल्या आहेत

उत्तम वेतन

ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग या क्षेत्राच्या वाढत्या गरजा दर्शविणाऱ्या नोकऱ्यांचा पगारही वारंवार वाढतच असतो

नोकर्यातील वैविध्य

केवळ गाडी दुरुस्त करण्याइतपत हे काम मर्यादित नसून कार अॅक्सेसरीज व कस्टमायझेषन सेन्टर येथे वअशाच प्रकारे अनेक ठिकाणी नोकरी मिळते

नोकरीचे ठिकाण

काही कारणासाठी ऐका ठिकाणाहून दुसरीकडे बदली हवी असेल तरी ऑटोमोबाइल इंजिनिअरला तेही कठीण नाही. आताशा खेडयापाडयापासून सर्वच ठिकाणी अशी सेवा असणारी केंद्रे असतात. त्यामुळे हव्या त्या ठिकाणी नोकरी मिळणे अगदी सहज शक्य आहे.

कामाच्या ठिकाणाचे वातावरण

प्रमाणपत्र मिळविलेल्या ऑटोमोबाइल इंजिनिअरला उत्तम वातावरणात उत्तम ठिकाणी नोकरीची संधी मिळणे आजिबात कठीण नाही. अनुभवी व कृशल तज्ञांच्या हाताखाली काम करण्यासारखा दुसरा आनंद नाही.

नैपुण्य वाढविणे

इतरांबरोबर मिळून काम करावे लागत असल्याने सर्वांशी जुळवून घेणे, वेळेला स्वतः काही बाबींचे नियोजन करणे वा निर्णय घेणे असेही आवश्यक ठरू शकते

मला ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाची माहिती पाठवा

आम्हाला या अभ्यासक्रमाची रूपरेखा सांगतांना व इतर गोष्टींबाबत माहिती देतांना निश्चितच आनंद होतो

ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम सी इ डी पी संस्थेतून का करायचा?

12 नंतरच्या उज्वल करिअरसाठी ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला खूप मागणी आहे. संपूर्ण भारतभर गाडयांची व गाडयांच्या वापराची प्रचंड मागणी असल्याने या कामात मिळणारा पैसाही भरपूर आहे. मुंबईच्या सी इ डी पी संस्थेतर्फे याचा अभ्यासक्रम अगदी उत्तमरित्या तयार केल्यामुळे ऑटोमोबाइल तंत्रज्ञानाच्या सर्वांगीण ज्ञानाचा विद्यार्थी पूर्ण अधिकारी बनतो. याच अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी प्रशिक्षण घेत असतांनाच विविध कंपनीत काम करतो व कामाला आवश्यक असा अनुभवही कमावतो. सी इ डी पी संस्थेने इतर मोठया औद्योगिक संस्थांशी संबंध जुळविले असल्याने ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम खर्या अर्थी उत्तमरित्या राबविला जातो व येथे अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला नक्कीच उज्वल भविष्याचा लाभ मिळतो.
सी इ डी पी कौशल्यवर्धन संस्थेने अत्यंत काळजीपूर्वक तयार केलेल्या ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमामुळे या औद्योगिक क्षेत्रात तुम्हाला उज्वल भविष्य असणार यात शंकाच नाही. पुढील लिंक क्लिक करून फी, विषय, कालावधीचे इतर तपशील जाणून घ्या
आता चौकशी करा