आमच्या विषयी - CEDP Skill Institute Mumbai

आमच्या विषयी

Home » आमच्या विषयी

2010 या वर्षी, एपीटी प्रशिक्षण आणि शिक्षणाद्वारे व्यक्ती आणि समुहांना सुधारित जीवनमान पुरवण्याच्या एकल उद्देशाने शिक्षण आणि विकास कार्यक्रम (सी ई डी पी) ची समिती तयार करण्यात आली. तेव्हापासून ही संघटना फक्त शहराच्या महानगरीय आणि लघू-महानगरीय शहरांनांच नाही तर बहुतांश केंद्रीत भागांमध्ये अत्यंत सुसंगत प्रशिक्षण उपाय पुरवण्याचा प्रयत्न करत आहे ज्यामुळे पुरवलेल्या शिक्षणामधून मिळालेल्या ज्ञानामधून विद्यार्थी समुदायाला मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल आणि ते त्यांची रोजगारक्षमता सुधारू शकतील आणि त्यामुळे रोजगार संधीही उपलब्ध होतील.

त्याचवेळी, कार्यसेनेच्या उत्पादकतेची पातळी अखंडपणे वाढवण्यासाठी राष्ट्रामध्ये चालणार्या् कंपन्यांच्या प्रशिक्षण आणि पुनर्प्रशिक्षण आवश्यकतांकडे अखंडपणे लक्ष केंद्रीत करत आहे. अशाप्रकारे, कंपन्यांना त्यांच्या यंत्रणेमध्ये संबंधित मनुष्यबळाची नियुक्ती, प्रशिक्षण आणि कायम राखण्यासाठी लागणार्यां प्रक्रिया आणि खर्चांच्या बाबतीत प्रचंड लाभ मिळेल.
सध्या सी ई डी पीची देशभरामध्ये 147 प्रशिक्षण आणि शिक्षण केंद्रे आहेत.

प्रशिक्षण आणि शिक्षण क्षेत्रामध्ये, सी ई डी पी पॅरामेडीकल, ऑटोमोटीव्ह, हॉटेल मॅनेजमेंट, इंडस्ट्रीयल सेफ्टी, वित्तीय हिशेबतपासणी आणि व्यवस्थापन, सिव्हील इंजिनीअरींग आणि व्यवस्थापन क्षेत्रामध्ये प्रशिक्षण पुरवते. या प्रोग्राम्सपैकी बहुतांश प्रोग्राम्स हे एकतर हमीपूर्ण इंटर्नशीप आणि /किंवा प्लेसमेंट सहाय्याशी संबंधित आहे. आणि यांपैकी बहुतांश प्रोग्राम्स हे प्रमाणपत्रे, डिप्लोमा आणि पदवी स्तरीय पुरस्कार आणि मान्यतांनी स्वीकृत आहे.

सी ई डी पी द्वारे उपलब्ध करून दिलेल्या विद्यापीठ संलग्नीकरणामुळे विद्यार्थी आणि कॉर्पोरेट्सना ऑफर केल्या जाणार्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये बरीच गरज असलेल्या औपचारीक शिक्षण उपलब्धता संस्थांना पुरवली जाऊ शकते. त्यासोबत, प्रशिक्षण आणि शिक्षण केंद्रे यशस्वीपणे प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी करू शकण्यासाठी सीईडीपी संपूर्ण संलग्नीकरण गतिविधींना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी, नियमित करण्यासाठी आणि सुवाह्य करण्यासाठी सुरूवातीपासून शेवटपर्यंत समर्थन पुरवते.

प्रत्येक प्रशिक्षण आणि शिक्षण कार्यक्रमाच्या शेवटी परिणामी सर्वांसाठी अगदी वेगळ्या आणि वृद्धी अभिमुख रोजगार संधी उपलब्ध होतील या विश्वासासह करीयर ग्राफद्वारे रोजगार सेवा देणे हे सी ई डी पीचे स्थापनेपासूनचे चरम ध्येय आहे.
या विश्वासानुसार, सी ई डी पी पुढे गेली आहे आणि त्यांनी ती प्रशिक्षण आणि शिक्षण देते अशा सर्व क्षेत्रांशी संबंधित कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रोग्राम्सच्या अगदी प्राथमिक पातळीपासून ऑन जॉब ट्रेनिंग मिळवण्यास मदत होईल. या प्रयत्नामुळे भागीदार कंपन्यांना त्यांची कार्यसेना नियुक्त करण्यासाठी, प्रशिक्षित करण्यासाठी आणि कायम राखण्यासाठी लाभ मिळत आहे.

सी ई डी पी सध्या राष्ट्रामध्ये त्यांचे नेटवर्क विस्तारण्याच्या विचारात आहे. जर तुम्ही एक व्यक्ती, अनौपचारीक समुह, संस्था, संघटना किंवा कॉर्पोरेट असाल ज्यांना आमच्या प्रमाणे विश्वासाची देवाणघेवाण करावी असे वाटत असेल, तर ही चर्चा पुढे नेण्यासाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा. एकत्रितपणे महत्वाच्या भागीदारीकडे पाहत आहोत!

संचालकांचा संदेश

सी ई डी पी ही विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे, त्यामुळे त्यांना जागतिक आव्हाने पेलण्यासाठी पात्र बनवते. तरूण पीढीमध्ये चांगले चरित्र उभारण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मूल्य-आधारित शिक्षण यंत्रणेच्या नीतितत्त्वांचे सी ई डी पीमध्ये सक्तीने पालन केले जाते.

सी ई डी पीच्या वतीने मी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो आणि मजबूत आणि आधुनिक भारत उभारण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते राष्ट्राला सेवा देतील अशी अपेक्षा करत आहे.

श्री. वसीम शेख-सी ई डी पी स्किल इन्स्टीट्यूटच्या संचालक. राष्ट्रीय शिक्षण उत्कृश्टता पुरस्कार 2017 मध्ये मुंबईतील सर्वोत्कृश्ट कौषल्य वर्धन संस्था 

विकसित होणारी आणि मोठ्या प्रमाणात व्यवसायिक बनत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसोबत, व्यवसायिक शाळांची भूमिका आणखी गुंतागुंतीची बनत चालली आहे. येणार्याळ दिवसांमध्ये अस्थिर पर्यावरणासोबत काम करण्याच्या दृष्टीकोनातून विशेषज्ञ व्यवस्थापकांची गरज असणार आहे. विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग आणि अनुकार तंत्रांद्वारे त्यांना उत्क्रांत होणार्याद आव्हानांना तोंड देणे शिकवण्यासाठी कोर्सचे घटक आणि डिलिव्हरी तंत्रामध्ये सुधारणा केली गेली आहे. विद्यार्थ्यांच्या निर्णय घेण्याच्या आणि विश्लेषण कौशल्यांची उभारणी करण्याकडे भर दिला जात आहे.

मुलांचा सर्वकश व्यक्तिमत्व विकास हे आणखी एक लक्ष देण्याचे क्षेत्र आहे.
आम्ही आमच्या विविध उपक्रमांमध्ये अनेक कॉर्पोरेट्सद्वारे सक्रिय सहभागाबद्दल त्यांचे खरचं आभारी आहोत. आम्ही नेहमीच उत्तेजन आणि आश्रय पुरवणार्याख व्यवस्थापन, अॅनकॅडेमिक अॅ्डव्हाजरी कौंसिल आणि बोर्ड ऑफ स्टडीजचे आभार मानत आहोत. आम्ही “बदल घडवणारी संस्था” निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून पुढील प्रवासामध्ये त्यांच्या अखंड सहभागाकडे पाहत आहोत.
अध्यक्षांच्या डेस्ककडून

शाहिन खान-सी ई डी पी स्किल इन्स्टीट्यूटच्या अध्यक्षा यांना इंडो अमेरीकन एड्युकेशन समिट 2016 मध्ये एमिनंट एड्युकेशनलिस्ट पुरस्कार मिळाला.

आम्ही उच्च शिक्षणाच्या प्रसाराची कारणे जाणतो आणि ती ग्रमीण आणि अर्ध-शहरी क्षेत्रांमध्ये त्यांचा विस्तार करणे हा सामाजिक कल्याणाला वर उचलण्यात योगदान देण्याचा एक मार्ग आहे. हे या आधी कधीहीपेक्षा खरा वर्तमान आहे. गेल्या शतकामध्ये किंवा आता आपली अर्थव्यवस्था एवढी पुढे जाऊ लागली आहे आणि गतीने बदलू लागली आहे. भौगोलिक सिमा त्यांचा अर्थ गमावत चालल्या आहेत. उत्पादन आणि किमतीच्या निर्णय बहुतांश बाजार तंतांच्या हुकुमावर प्रभावीत होत आहे. सध्या पूर्णपणे बदल झालेल्या आणि गतिक व्यवसायिक परिस्थितीमध्ये, तांत्रिक आणि व्यवस्थापकीय शिक्षण विशेष स्थान प्राप्त करत आहे.


तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कौशल्यांची मागणी वाढत आहे. गुणवत्ताधारक आणि महत्त्वाकांक्षी तरूण मुलं आणि मुली ते ज्या शिक्षण प्रकारामधून जात आहेत त्या संबंधात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच महत्व गतिने समजून घेत आहेत. ही निर्णय घेण्याची संवेदना आहे आणि त्यांचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी परिश्रम करण्याची त्यांची इच्छा असणे आवश्यक आहे. इन्स्टीट्यूटमध्ये आम्ही यासंबंधी योगदान देण्याकडे पाहत आहोत. आम्ही या अध्ययनाच्या मंदिरात आपले स्वागत करतो. इन्स्टीट्युटमध्ये आम्ही तसेच चांगल्याप्रकारे संसाधित वचनबद्ध समूह म्हणून आम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करण्यामध्ये योगदान देऊ शकतो. सर्वांना या प्रयत्नामध्ये यश देण्याची प्रार्थना आम्ही देवाकडे करतो.
उपाध्यक्ष-शाहिन खान